पावसा
पावसा
1 min
340
नजर वळली माझी
आज या आकाशाकडे
येरे पावसा तू लवकर
साकडे घालतो तुझ्याकडे
पाण्यासाठी पाखरे
किती फिरतात
आणतील दाणा चारा
पिल्ले वाट पाहतात
खूप हंबरून वासरे
गुपचूप गोठ्यात बसली
मिळेल कधी हिरवा चारा
वाट पाहू लागली
गरमी किती होतेय
घामाने अंग भिजलं सारं
येरे पावसा तू लवकर
करून टाक आम्हा गार
आसवे गाळून नयन
झाले किती कोरडे
कीव कर जराशी आमची
धारा येऊ दे आमच्याकडे
