पावसा पावसा
पावसा पावसा
पावसा पावसा...
तू आहे हवाहवासा
तुझ्याविना जीव होतो
नकोनकोसा
पावसा पावसा...
नको पडू भसाभसा
जीव होतोया आता कसाबसा
पावसा पावसा...
पड आता तू जराजरासा
तुझ्या साठ्यावर जीवांचा भरोसा
पावसा पावसा...
अती झाल्या तुझ्या स्वच्छता मोहीमा
धुवुन काढलं सारं, तू रे असा कसा
पावसा पावसा...
जीव वाहूनं नेतो रं असा कसा
माणुसकीला जागं करतोस असा
पावसा पावसा...
तुझ्यामुळे मला देवमाणूस दिसला
माणसा पाऊसही रडला ढसाढसा
पावसा पावसा...
नको रडू ढसाढसा
जीव होतोय आता वेडापिसा
पावसा पावसा....
बचाव पथक येतंय, बघं पावसा
माणसाने माणसाला दिला दिलासा
पावसा पावसा...
तू निसर्गाला जपतोस असा
बघ, माणुसकी घेते माणसाचा खुलासा
पावसा पावसा...
हाक आमची ऐक जरा पावसा
निसर्गदेवता राग तुझा असा कसा
पावसा पावसा...
नको करु सारीकडे जलमय आरसा
प्रतिबिंब बघं तुझे दिसतो कसा
पावसा पावसा...
आरशात बघ, जीव त्रासला कसा
व्याकूळ जसा पाण्याविना मासा
पावसा पावसा...
प्रार्थना आमची ऐक आकाशा
बदलून गेला आमच्या गावाचा नकाशा
पावसा पावसा...
घे रे आता विसावा जरासा
धरतीला थकवा काढू दे जरासा
पावसा पावसा...
सुर्यनारायण दिसू दे जरासा
सुर्यनारायण आता तुझ्यावर भरोसा
पावसा पावसा...
पुरामुळे माणसाला देवमाणूस दिसला
लष्कर, सुरक्षारक्षक, संस्था, लोकं हाच देव
