Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Abasaheb Mhaske

Others

3  

Abasaheb Mhaske

Others

पावसा पावसा

पावसा पावसा

1 min
199


पावसा पावसा

तू असा रे कसा ?

येतोस जातोस

का बरं स्वमर्जीने ?


पावसा पावसा

कधी येशील सांग ना ?

कि नाहीच येणार सध्या

तुझा काय भरवसा ?


पावसा - पावसा

देऊ नको झाँसा

त्यासाठी पुढारी

बक्खळ हायसा


पावसा - पावसा

नको रे असा जाऊस

कठोर नको रे होऊस

ठेवतो माथा तुझ्याच पायी


पावसा पावसा

ये कधीही रात्री दिवसा

कसाही अन केंव्हाही

पण असा रुसू नको रे


पावसा - पावसा

तू सर्वांचा तारणहार

प्रेयसी तुझी सरिता

ओढ तुझी तिला


पावसा पावसा

धरणी तुझी माता

तू सर्वांचा पिता

अजाण आम्ही तुझी लेकुरे


Rate this content
Log in