पावसा पावसा रोजच ये
पावसा पावसा रोजच ये
1 min
203
ढग गडगडले, चमकल्या विजा
आला आला ' पावसाळा'
'काळे कुट्ट 'मेघ दाटले
आकाशाचा झाला रंग ' निराळा '
धोधो धोधो पाऊस आला
सुमधुर संगीत आले कानी
झाडे वेली टवटवीत झाली
स्वच्छ सुंदर धारांनी न्हाऊनी
मोर ' पिसारा ' फुलवून नाची
स्वर मधुर ती ' कोकीळ' वाणी
मुले भिजत गाती गाणी
नाचू लागली आनंदानी
पावसाचे थेंब थेंब झेलती
मौज मजा सारे करती मस्ती
जिकडे तिकडे पाणीच पाणी
शाळेला जी मिळाली 'सुट्टी '
पावसा पावसा रोजच ये
आम्हाला भिजायला कारण दे
नको रेनकोट,नको छत्री
हवा तेवढा कोसळून घे
