पाऊसराजा (हायकू)
पाऊसराजा (हायकू)

1 min

53
ढगांची झाली
दाटी आकाशी खूप
अनोखे रूप.
दामिनी करी
नभी कडकडाट
लखलखाट.
सों सों सुसाट
आसमंतात सारा
भन्नाट वारा.
थेम्ब टपोरे
झरझर झरती
मातीवरती.
चिंब जाहली
डोंगर, रानेवने
हर्षित मने.
भिजल्या वेली
तरुवर भिजले
रूप सजले.
नाचत बघा
आला मृग साजिरा
कसा गोजिरा.