STORYMIRROR

Ramkrishna Nagargoje

Others

4  

Ramkrishna Nagargoje

Others

पाऊसधारा

पाऊसधारा

1 min
111

उंचउंच पहा आकाशी,

झुंबर लागले काळेनिळे,

काय चमकले ढगात सारे,

शुभ्र पांढरा, विजेचा प्रकाश पडे

आवाजाने कान उघडे


आला आला पाऊस सारा,

कोसळती तिरप्या धारा,

फांद्या डौलती फुले हासती,

कोकिळेचा कंठ गातो,

नाच मोरांचा पहा जरा


असाच पाऊस येत राहू दे,

भिजू दे तुझी तनू काया,

अंग चोरुन उभी राहिली,

दात चमकती विजेसारखे,

जशी तू रंभा की,

जशी तू स्वर्गाची अप्सरा


नदी वाहते, पर्वत सारा हिरवा,

ढग देतो, मोत्यांच्या धारा,

कोसळती साऱ्या धारा,

धराधरा तू सोसशी तू, धारा


असाच पाऊस येत राहतो,

बघ तो इंद्रधनू उभा,

गवतावरती दवबिंदू सारे,

चमकती मोती शुभ्र पांढरे,

जशी ल्याली धरा,

शालू हिरवाहिरवा


शिवार हसतो, रान फुलवितो,

पक्षी उडती गाणी सारे,

पाऊस पाणी आनंद सारा,

ग्रहामधी, ग्रह बघ पहा,

कशी नटली माझी धरा


पाऊस सारा येत राहतो,

फुलवितो रानमळे,

फुलात पराग चमकला,

येत रहा तू पावसा,

चालवी जलचक्र हे,

पाऊसधारा, रवीमित्र,

आकाशी बरा


Rate this content
Log in