STORYMIRROR

Vasudha Naik

Others

3  

Vasudha Naik

Others

पाऊसधारा या जलधारा

पाऊसधारा या जलधारा

1 min
227

आल्या रिमझिम पाऊसधारा

सुटलाय असा बेभान हा वारा....,


नभ उतरू आलयं या धरतीवर 

जलधारांचे नृत्य या सृष्टीवर...


देखणा नजारा पाहावयास गेलो

निसर्गातच तासनतास आम्ही रमलो...


नवी पालवी नवी नवलाई गर्द वृक्षांची

भुवरी झुलण्याची घाई नाजूक वेलींची..


जलधारांनी तळे तुडुंब छान भरले

सृष्टीचे रूप अंतरात खोल रूजवले..


प्रीत पावसाची चालूच होती न्यारी

वसुंधरेला भेटण्याची त्याची घाई भारी..


मयूरपंखी धरेला मनी कोंदणात ठेवले

लाडक्या सृष्टीला पावसाने चिंब भिजवले...


Rate this content
Log in