STORYMIRROR

Manish Ahire

Others

4  

Manish Ahire

Others

पाऊसाचे गाणे

पाऊसाचे गाणे

1 min
46

आली आली धार पावसाची आली l

थेंबांच्या स्पर्शानं जणू धरित्री लाजली ll धृ ll

झाली हिरवी शेतं अनं झाली हिरवी डोंगर l

होऊन आनंदाने वेडा नाचे राणामधी मोर ll1ll

क्षितिजही जणू काही डोंगराला टेकले l

गवताच्या सोबत झाले तेही हिरवे ओले ll2ll

हिरवे हिरवे तण करती धरीत्रीवरी वस्ती l

येरें येरें पावसा जणू तेही गाणं गाती ll3ll

निसर्गाचं रूप सुंदर, मना आजी भावलं l

स्पर्शानं थेंबांच्या जणू तेही कविता झालं ll4ll


Rate this content
Log in