STORYMIRROR

परेश पवार 'शिव'

Others

3  

परेश पवार 'शिव'

Others

पाऊस

पाऊस

1 min
206

जिव्हारी लागतो पाऊस

रात्रीस जागतो पाऊस

काय बिनसले कुणास ठाऊक

असा का वागतो पाऊस?


चिंब भिजतो पाऊस

मातीत रुजतो पाऊस

पाहता तिला माझ्यासवे

जागीच थिजतो पाऊस


माझ्याकडे पाहतो आहे

गाली रेंगाळतो पाऊस

पुस्तकात आठवांच्या

टिपे का गाळतो पाऊस?


किती तो काळ लोटला

काळात लोटतो पाऊस

टपोऱ्या डोळ्यांच्या सयीने

आजही पेटतो पाऊस


तिच्यासारखाच सवयीने

माझ्याशी भांडतो पाऊस

बंद खिडक्या दारे तरी का

उशाशी सांडतो पाऊस??


Rate this content
Log in