पाऊस!!
पाऊस!!
1 min
371
काहींना आवडतो काहींना रुसवतो
भिजवुनी त्यांना अवेळी निघून जातो
मिट्ट काळोखात अलगद हा मनाला
आनंद क्षण देत सर्वांना खेळवुनी जातो
वाट त्याची वर्षभर पाहातो
चाहूल लागताच धावत-पळत सुटतो
बरसरणाऱ्या सरीत मी भिजत राहतो
गिरकी घेताच वारा मज कवेत घेतो
भिजत भिजत मनी विचार येतो
पाऊस अलगद मनात दाटतो
थंड शहारे देत अंगी निजतो
गोड स्वप्नात मन माझे विहरुनी नेतो
शब्द नि:शब्द होऊनी जातो
निसर्गाचे हे रूप पाहुनी
हिरव्या रंगाची रेशीम पाती
जागोजागी पसरून ठेवुनी
बोलावे तेवढे कमीच आहे
मंद मंद असा सुहास आहे
आठवतो तो पाऊस मजला
त्यात माझा श्वास अडकुन आहे
त्यात माझा श्वास अडकून आहे
