पाऊस
पाऊस
तुझ्या माझ्या भेटीतला
तो पाऊस
आज ही येतो.....
कधी कधी भेटीला..
सहज आलो म्हणून..
विसावतो ओसरीला....
छेडतो कधी कधी...
ते गीत मिलनाचे.....
डोळ्यातील पावसांचे,
कधी विरहाच्या वेद्नांचे
कधी हरवतो स्वत:तच...
तर कधी भुलवतो मला ही..
कधी दु:खाचे मोती वेचित तो खेळ मांडतो
तर कधी हळुच तालांवर शब्दांच्या माळा गुंफतो
मी सांगते त्यास....
विसर झाले गेले सारे
नको छेडूस...ते जुने तराणे...
कर नव्याने सुरु सारे
शोध काही नवे बहाने..
तर म्हणे नाही जमत मला... तुझ्यासारखे वागणे...
ओठांवर हसू ठेवत...
मनाच्या खोल जख्मांमध्ये विव्हळणे.......
दांभिकपणे जगणे अन् ....झेलूनी अव्हेलना आतच गुदमरणे...
मी आजही मुक्त पणे बरसतो
काल तुझ्यासोबत... तर आज खारे पाणी होऊन.......
तुझ्या शिवाय बरसतो....
