STORYMIRROR

Ashok Shivram Veer

Others

3  

Ashok Shivram Veer

Others

पाऊस

पाऊस

1 min
159

सर-सर सर-सर कोसळती पाऊसधारा,

झर-झर झर-झर वाहतो वादळ वारा.

पशू-पक्षी अन गाई-वासरे चिंब झाली,

वनचरे अन वृक्ष-वल्ली पावसात न्हाली.

खळ-खळ वाहू लागले झरे, ओढे-नाले,

सारेच सजीव वर्षाने सुखावून गेले.

लगबग सुरु झाली औत-बैल जोडणीची,

वंदन करूनी धरणी मातेला सुरुवात पेरणीची.

उद्या रुजेल बीज हे अन उगवेल पीक मातीतूनी,

रानफुले ही डोकावतील माळावरच्या गवतामधुनी.

दिशा-दिशा बहरतील हिरव्यागार वनराईने,

बळी-राजाही होईल आनंदी सुख-शांतीने.

मिटेल उद्याची चिंता, अन विझेल मनातील चिता,

पुन्हा दाखवून देईल सर्वांना तोच आहे जगाचा करता अन करविता.


Rate this content
Log in