पाऊस
पाऊस
1 min
267
एकदा,
खरंच सांगतो
पावसात खूप भिजायचं
असं ठरवलं होतं
पण...
मी पावसात भिजण्याऐवजी
त्यानंच मला
भिजवलं होतं
त्याच्या भीतीनं
घरात जाऊन बसलो
पण पठ्यानं
प्रत्येक वाडीत, कॉलनीत
अगदी गल्ली बोळात जाऊन
तपास केला असावा माझा
मी कोठेच सापडत नाही
पाहूनसं, तोही चवताळला
अन् .....
बरसत गेला जोरात
अगदी ....
सर्वांना नकोसा होईपर्यंत
