पाऊस...!
पाऊस...!
1 min
12K
पाऊस आला पाऊस आला
सारे बोंबा मारू लागले
मिळेल ते डोक्यावर घेऊन
आडोश्याला जाऊ लागले....!
कोण म्हणे लेका
गाडी जरा हळू मार
कोण म्हणे लेका
जरा गाडी बघून मार....!
अरे रे लेका भिजलो की
सावकाश जरा बेट्या जा की
सणक कोणाच्या डोक्यात जाते
रस्त्यावरच चांगले भांडण झुंबते...!
इतक्यात शिट्टी कानावर येते
चला चला लई झालं म्हणून
कोणीतरी हात धुवून घेते
बघता बघता
सर पावसाची निघून जाते....!