पाऊस
पाऊस
1 min
125
भयाण त्या पावसाचे
मी रुद्र रूप पहिले ।
गेले वाहून सारे बऱ्याचजनाचे
मेहनतीने घर बांधलेले।
वारे सुटे खूप वेगाने
झाडे उन्मळून पडती ।
क्षणात होत्याचे नव्हते
निष्पाप जीव रडती।
वाहतूक होई ठप्प
बातम्या त्या बघवेना
मनात एकच धावा
देवा, पाऊस हा थांबवाना ।
घुसती घरात पाणी पावसाचे
पिल्ले दोन चिमुकली कोपऱ्यात ।
आई बाबा रात्रभर जागेच
कधी होईल सुप्रभात ।
अशा भयाण पाऊस
मी अनुभवलेला आहे
वेळ अशी कुणावर न येवो
ही एकच प्रार्थना आहे।
