पाऊस
पाऊस
1 min
239
पाऊस जनातला
पाऊस मनातला
पाऊस भिजवितो
पाऊस लाजवितो
पाऊस हसवतो
पाऊस रडवतो
पाऊस खेळवतो
पाऊस पळवतो
पाऊस ताल धरी
पाऊस गंमत करी
पाऊस अंगावरी
मन घेई भरारी
कधी टप टप टप
कधी रप रप रप
कधी मन पाखरू
कधी गप गप गप
