STORYMIRROR

सचिन विश्राम कांबळे

Others Children

3  

सचिन विश्राम कांबळे

Others Children

पाऊस

पाऊस

1 min
202

आला घालीत 'शिळ' 

सुरू वर्दळ वाऱ्याची..

'आरोळी' चातकाची

ती 'चाहूल' पावसाची..


किलबिलाती पक्षी

घरट्याकडे परतले

प्राणी वनी बोकाळले

रान सारे दुमदुमले


मेघनाचा तो निनाद 

कडाडली 'सौदामिनी '

धरणीला भेटाया आली

'वर्षा'राणी ती धाऊनी


दाटून आले घन काळे

बेधुंद सारा आसमंत

बरसल्या बेभान सरी

पसरल्या धरतीवरी अनंत


आल्या 'पाऊस धारा'

संग घेऊन 'गारवा'

शहाराली झाडे वेली

साज चढला 'हिरवा'


निज घेणारं मातीत

जागं झालं ते 'बियाणं'

येईल 'अंकुर' त्याला

होईल हिरवं माळरानं


सृष्टी झाली ही 'आनंदी '

बघ तुझ्या आगमनाने

खरी 'नटेल' ही धरती

आज तुझ्याच कृपेने


Rate this content
Log in