पाऊस
पाऊस
1 min
378
पाऊस आला बरसुनी गेला
कळले ना रात्रच भिजवुनी गेला
नभ फ़ाकले सौदामिनी ने
गड़गड़त कड कड नाचूंन गेला
त्या रातरानी चे झाड़ ओलेचिम्ब
प्राजक्ताचा सड़ा शिंपुन गेला
टप टप अजूनी पानावरुनी
नखशिकान्त तो ही मोहरुन गेला
चन्द्र चांदन्या ची कुजबुज कानात
मृदु गन्ध रानी पसरवुन गेला
लाजत लाजत पहिल्या सरीने
माती मातीत मिसळून गेला
ज्याची वाट पहात व्याकुळ धरती
नक्षत्रा ची रांगोळी काढून गेला
आला आला आता पावसाळा
चिम्ब चिम्ब करूनी सृष्टि मातेला
श्रावण येईल इन्द्रधनु रेखील
मोरांच्या पंखाने चित्र ही कढील
भाद्र पदा उन्हात पांचू च्या बनात
गौरी संग बाजूला गणेश बसेल
आला आला ऋतु। पावसाळा
तनात मनात शेती त आला
