STORYMIRROR

Sayli Kamble

Others

3  

Sayli Kamble

Others

पाऊस

पाऊस

1 min
374

पावसाच्या धारांनी मन झाले ओलेचिंब

आता आभाळही पाहू शकेल पाण्यात स्वतःचे प्रतिबिंब


टिप टिप असो वा रिमझिम, तुझं येण हे मनाला भावत

नाहीतर अपुल्या आगमनाची कोण बर इतकी वाट बघायला लावत


एकटा तू कधी येत नाहीस, सोबत आणतोस वाऱ्याची  झुळूक

आकाशात काळ्या ढगांची गर्दी पाहताच मनास मात्र लागते रुखरुख


ऋतूंचा राजा तू , चार महिने राज्य करतोस

प्रखर किरणांनी तळपणाऱ्या सुर्य देवालाही  तू शमवतोस


दररोज दिसणारा परिसर हि पावसात नावानवासा वाटतो

अगदी खिडकीच्या काचेवरून ओघळणारा थेंब हि लक्ष वेधून सुंदर भासू लागतो


Rate this content
Log in