पाऊस
पाऊस


काळे ढग झाले जमा
आले आभाळ भरून
एकमेकांचा करी आदर
घाली प्रेमाचे आलिंगन
गार वारा हा सुटला
निरोप देण्यास धरतीला
आला वेगाने धावून
झाला आनंद सृष्टीला
वीज कडकडाट करी
जीव धरतीचा घाबरे
देतो इशारा धरतीला
माणसांनो सावध व्हा रे
सुरु झाल्या सरी वर सरी
ओलेचिंब केले हो धरणीला
लाजून धरती न्हाली
सुखी करण्यास मानवाला
पक्षी, प्राणी सुखावले
झाला आनंद जगण्याला
फुटे हिरवी पालवी
राहण्यास घरटे आधाराला
चिंता त्यांची हटवली
सुखद सुंदर पावसाने
जगण्यास हिंमत दिली
मन मोकळ्या विचाराने
मुक्या प्राण्यांचे जगणे
हिरव्या धरतीची माळ
स्वच्छंदी मनाने खाई चारा
हिंडती सारी रानोमाळ
इंद्रधनुष्य गगनी
सप्तरंगांची उधळण
आहे किमया निसर्गाची
सर्व मानवास आकर्षण