STORYMIRROR

Surekha Nandardhane

Others

2  

Surekha Nandardhane

Others

पाऊस

पाऊस

1 min
80

ढगांचा गडगडाट . विजांचा कडकडाट

गारठलेल्या संध्याकाळी वाऱ्याचा सुळसुळाट….


सरसरणाऱ्या सरी बरसणाऱ्या धारा

धावताना धरपडतो कोणी सावरतो कोणाला….


धरताना हात सख्याचा मन कसं बावरते

बरसणाऱ्या धारेमध्ये कोणी हरवलेले क्षण शोधते….


कोणी पावसात लपवितात आसवे आपली

मन हलके करून बागडतात सखे सोबती ….


कोणासाठी गर्द गहिरा कोणासाठी हिरवे रान

पाऊस म्हणजे वेगळीच धुंदी हरवून जाई मनाचे भान.….


Rate this content
Log in