पाऊस सारी
पाऊस सारी
1 min
79
रम्य ही हवा, सुंदर गारवा.
पाऊस सरी मन हे आनंदे भरी.
पक्षी उडुनी झाडांच्या कुशीत ते शिरी.
काय माझे मातीशी ह्या नाते?
बहरली ती, की मी मोहरून जाते.
पाहून तिचा अंकुर कोवळा कोवळा,
माझ्यात नवजीवन पल्लवीत होते.
डोळयात साठवून ठेवावा,
असा सर्वांग सुंदर तिचा देखावा.
शब्द अपुरे भासती,
कल्पना पक्षी होऊनि स्वछंदें उडती.