पाऊस पहिला
पाऊस पहिला




पाऊस पहिला आवडणारा
मनाला धुंद करणारा
ओल्या मातीचा सुगंध
चहूकडे दरवळणारा
पाऊस पहिला रिमझिमणारा
छेड वृक्षांची काढणारा
हलके तुषार उडवूनी
काया त्यांची लाजवणारा
पाऊस पहिला बरसणारा
धरतीला न्हाऊ घालणारा
मोत्यांच्या सरीमध्ये
साऱ्यांना चिंब करणारा