पाऊस अनामिक
पाऊस अनामिक

1 min

79
मन चिंब होते
घन बरसुन येता
पायवाटही शृंगारते नव्याने
पाऊस अनामिक पाहता
सृष्टी हसते गाली
नभ भरून येता
आभाळ खोडकर गर्जते
पाऊस अनामिक पाहता
अंकुरते नवे काही
जलधारा वळुन येता
दवबिंदु ऊगीच डौलात
पाऊस अनामिक पाहता
मनिच्छा स्पर्शिते अंतरी
तुझी आठव येता
स्मितवदने भरते ओंजळ
पाऊस अनामिक पाहता