पाऊस आषाढांतला
पाऊस आषाढांतला
1 min
263
पाऊस सक्रिय होतो आषाढ महिन्यांत
चैतन्याने फुलून सर्व जाती चराचरांत
धरती होते चिंब ओली आणि हिरवीगार
आषाढांत पावसाला असतो अधिक भार
सृष्टीमध्ये निर्माण करतो पाऊस ओलावा
रानावनात, माळावर पसरवतो तो गारवा
पशुपक्षी व समस्त जीवांना मिळे समाधान
पक्षी नाचती झाडांवरती घेऊन आपलीच तान
पाणीच पाणी चहुकडे, मुले सोडतात होड्या
भर पावसांत अल्लडपणे करतात विचित्र खोड्या
शेतकऱ्यांचे मन डोलू लागते आपुल्याच नादांत
मन प्रसन्न झाले सर्वांचे सगळेच आनंदात
