पाऊस आला
पाऊस आला

1 min

19
रिप रिप येईल नभातून
हे वेध पावसाचे
जून माह सुरू झाला
स्मरण झाले गतकालाचे...
रंग हिरवे घेऊन येईन
पानोपानी जल दिसेन
जलबिंदूंचा हा नृत्याविष्कार
मनास खूप भावेन...
पाऊस आला, पाऊस आला
बालपणीच्या आठवणी
जिवंत अशा झाल्या
सुगंध मातीचा अजूनही स्मरणी...
मित्र माझा, सखा माझा
हा मनभावन पावसाळा
देतो ओलावा सर्व भूमीला
गरम चहाचा स्वाद आगळा...
तनूवर तुषार घ्यायला
मस्त पावसात भिजायला
खूपच आवडते मला
गरमागरम भजी खायला...