पाऊस आला
पाऊस आला
1 min
388
ओलेती माती, ओलाच गंध
ओल्या सरींचा,मनी सुगंध
ओलेती सांज,ओलाच वारा
ओल्या सागरी ओला किनारा
ओले च मन,ओले ते क्षण
ओला ओलाच कण नी कण
ओले ते झाड, ओले ते रान
ओले ओलेच पान नी पान
ओला तो चंद्र ,ओले ते पक्षी
ओल्या आभाळी,ओलेती नक्षी
ओला तो ढग, ओला तो थेंब
ओल्या सरीनी,थेंब ही चिंब
सूर्य ही ओला किरण ही ओले
ओल्या किराणांचे कवडसे ओले
पहिल्या पावसाचा घेऊनी रंग
ऋतु ही झाला ओला त्या संग
धरती चा शालू ओलेता झाला,
मनी मानसी पाऊस आला
