STORYMIRROR

Samiksha Jamkhedkar

Others

2  

Samiksha Jamkhedkar

Others

पाऊस आला, पाऊस आला

पाऊस आला, पाऊस आला

1 min
41

पाऊस आला पाऊस आला

आधी गरीबाच्या झोपडीत

लहानपोरासारखा नाचला थोडावेळ।

पाहून त्यांची फजिती मनाला घालतो आवर।

आई होती उभी घेऊन हातात गादी।

वडील बिचारे काढत होते 

घरातले पाणी।

बहीण भाऊ कोपऱ्यात एका 

कोरड्या जागी गाढ झोपलेले

कसला पाऊस अन काय दिवसभर होते दमलेले।

मी आल्यावर होते फजिती गरिबांचे असे पावसाला कळले।

पावसानेच मग स्वतःचे दोन आसू

पावसातच गाळले।

पाऊस आला पाऊस आला

गेला श्रीमंतांच्या बंगल्यावर

त्याच्यासाठी घरात त्याला नव्हती जागा। खिडकीच्या आत डोकाऊन बघतसे बाहेर राहून उभा।

आई करीतसे गरम भजी आणि चहा त्याच्याबरोबर।

वडील घेऊन बसले दोन मुलांना भजी खात टीव्ही समोर।

वीज ऐकून घाबरत होती अन लाडाने ओरडायची।

आणि कुशीत बाबांच्या मांडीवर झोपायची।

पावसाला ही मग वाटले थोडे वाईट।

पावसाने मग एकच मारली फाईट

श्रीमंतांच्या घरातले वातावरण केले tight ।।

Light घालवली अंधार केला सगळीकडे।

 गरिबांच्या झोपडीत मी खूप दुःख पहिले आता तुम्हालापन देतो थोडे।

मी पण जाणून बुजून फजिती त्यांची केली।

पाऊस आला पाऊस आला कविता माझी पूर्ण झाली

कविता माझी पूर्ण झाली


Rate this content
Log in