STORYMIRROR

Bharati Sawant

Others

2  

Bharati Sawant

Others

पाऊलवाट

पाऊलवाट

1 min
408

पाऊलवाट काट्याकुट्यांची

सखे टाक ते पाऊल हळुवार

घुसेल काटा कोमल पायात

काढ ओढून त्याला अलवार


बळीराजासाठी ही मळवाट

मार्ग सत्याचाच नित्य धरुनी

रोजच काटे जीवनात असती

चालतो सदा पायवाटेवरूनी


खाचखळग्यातुन सरकत जाई

पाऊलवाट ही मध्यान्ह रातीची

पायवाट असे दऱ्याखोऱ्यातली

बेधूंद करणाऱ्या अबोल प्रीतीची


अंगाखांद्यावर खेळुन गेलेय तिच्या  

माझे अल्लड अवखळ हे बालपण

कधी दुखवले नाही वाटेने मजला

पसरली रानफुले येता मज यौवन


सुटला घमघमाट या रानफुलांचा

गावच्या सानुल्या पाऊलवाटेवर

मृदगंधही या शिवारात दरवळला

तरंग उमटला नदीच्या या लाटेवर


Rate this content
Log in