STORYMIRROR

Rohit Khamkar

Others

3  

Rohit Khamkar

Others

पाठवणी

पाठवणी

1 min
335

कैक जबाबदाऱ्या पडताच, बाप झालो.

जगण्याच्या नैराश्यात, आनंदी झालो.


पुन्हा सुरू झाल, माझ एक बालपण.

सगळ विसरून जायचो, जगायचो आजपण.


कामावरून आलो की, थकलेला असायचो.

तुझ्याशी खेळताना, नव्या जोशाने खेळायचो.


जगायचा मनसोक्त तूझा बाबा, तूझ्या सोबत.

तू गेल्यावर आता, बालपण नाही माझ्या सोबत.


एवढी मोठी कधी झाली, कळलच नाही.

एक बाप गर्दीत उभा राहून, पोरीच लग्न पाही.


लग्न तूझ लावताना, आठवत होत्या सगळ्या आठवणी.

पाणी दाटत होत डोळ्यात, जवळ येत होती पाठवणी.


साहित्याला गुण द्या
लॉग इन