*पाठवणी.....*
*पाठवणी.....*
सतरा वर्षाची झाले
तेव्हाच बोहल्यावर चढले
पाठवणी केली माहेराहून
सासरी आता मी विसावले...
माहेरची माणसे सोडून
सासरची माणसे जोडली
कुटूंब जरी नवीन मला
त्यांचीच मी होवून राहिली...
सजणाने उत्तम साथ दिली
त्याच्या प्रेमात न्हावून निघाले
सासू, सासर्यांच्या मनात
मी छानच हो उतरले...
संसार झाला सुरू माझा
रमू लागले हो संसारात
माहेरी जावून कधीतरी आता
खेळू लागले मी भावंडात....
संसार फुलवताना आमचा
वेलीला तीन फूले आली
त्या फुलांना सांभाळताना
पुरतीच फजिती होवू लागली....
मुले झाली मोठी आमची
ते त्यांच्याच विश्वात राहू लागली
स्वतःचे पार्टनर ते मित्रमंडळीत
शोधण्यात आता गर्क झाली.....
मुलीला मिळाला छानसा
तिचा मित्रच नवरा भला
जावई मिळाला आयता आम्हांला
खूपच हो चंगाभला.....
आई,बाबांनी माझी
पाठवणी केली होती
मी आता आमच्या मुलीची
पाठवणी करणार होती.....
पाठवणीत रडू येईल
एका माझ्या डोळा
तर हसू येईल हो
दुसर्या माझ्या डोळा...
