पाठीशी तू
पाठीशी तू
1 min
253
कोणी नसलं सोबत
तरी तू मात्र कायम रहा
आयुष्य जगताना
सावलीसारखं फक्त पाठीशी तू रहा
खेळ खेळताना हारत असेन मी
तरी तू मात्र साथ दे
डाव नको खेळू माझा
पण सारथीसारखं फक्त पाठीशी तू रहा
रडत असेल मी तर
थोडंस हसव मला
कोसळत असेल मी तर
भक्कम आधार देणाऱ्या भिंतीसारखं फक्त पाठीशी तू रहा
चुकत असेन मी तर
रागवत जा मला
चूक सुधारण्यासाठी मात्र
मार्गदर्शक बनून नेहमीच फक्त पाठीशी तू रहा...
