पातं
पातं
वार्या , पावसासोबत आलेलं एक बी मातीत पहूडतं
अन् हळूच कुशीत शिरून झोपून जातं ...
मीटल्या डोळ्याने अंधाऱ्या जगात चाचपडत उजेडाकडे झेपावतं ,
नव्या नवलाई अन् हिरवाईने जगाकडे बघतं, पाण्याच्या साथीने सुर्यकिरणांनी न्हात वाढीला लागतं ,
मातीला घट्ट धरून राहू लागतं ,
लवलवतं पातं डोलू लागतं,
निस्वार्थ पणे देणं देत रहातं,
नविन जग बहरत जातं...
सभोवतालशी नवीन नातं जोडत रहातं
त्या नात्याला नाही देता येत कोणतही नाव,
नसतं त्याचं कोणतही बंधन,
निसर्गानं निसर्गाशी एकरूप होऊन बंधनातीत निर्मीत होत गेलेली एक नाळ...
त्या नाळेमुळे जगाशी नातं जुळत रहातं,
ती नाळ तुटली तर मी अस्तित्व शुन्य होते
ती नाळ तुटून नये म्हणून मी कायम तो अंकुर वाढवत ठेवते ...
ओंजळभर का होइना पाणी घालत रहाते
निसर्गाचं एक रूप जपत रहाते ...
