पासबुक (रुसते)
पासबुक (रुसते)
1 min
364
हल्ली असंच होतं
पास बुक रुसतं
एन्ट्री नाही म्हणून
सहजच फसवत
तारखा नोंदी
राहून जातात
उगाचच आम्हाला
त्रास देतात
जमा असता
अपमान करतात
बॅलन्स साठी
नाक मुरडतात
डोळे उघडून
सारखे पाहावे लागते
तेंव्हा कोठे
पासबुक हसते
शरम वाटावी
अशी अवस्था होते
तेंव्हा पण निर्लज्ज
ते पुन्हा असते
राग अनावर होतो
पण नाईलाज असतो
जेव्हां एकच आकडा
पुन्हा पुन्हा आम्हास दिसतो
चेक बिचारा
हिरमुसतो अन
बॅलन्स च्या अशेपोटी
मुकाट्याने परत घरी येतो..!
