पापण काठ
पापण काठ
1 min
164
*पापणकाठ*
पती- पत्नी दोघेजण
नांदत होते अती आनंदात
संसार चालला होता धुंदीत
रमले होते स्वतःच्या सुखात...
घाला घातला अचानक दैवाने
सुख घेतले देवाने हिरावून
पती राजाला झाली देवाज्ञा
पत्नी गेली ना पार हिरमुसून....
हितगुज करू लागले नयन
आसवे गळू लागले गालावर
थांबायला तयार नाही पापणकाठी
दुःख कोसळले कुटुंबावर....
आठवतात त्या प्रेमळ गाठीभेटी
तो जवळ आहे असेच जाणवते
भास होतो सतत पती राजाचा
हे काही पत्नीला न उमजते...
*वसुधा वैभव नाईक*
*धनकवडी,जिल्हा - पुणे
