पाणी....!
पाणी....!
आज ग्लोबल वार्मिंगच्या युगात
घोटभर पाणी मिळविण्यासाठी
पार्थालाही विचार करावा लागेल
हजारदा ....
गांडीव धनुष्याची प्रत्यंचा चढवितांना
कारण ;
पाणी सार्वजनिक कुठे राहिलेयआता?
भगीरथही विचार करेल हजारदा
गंगेला धरतीवर आणण्यासाठी
गंगेला अपवित्र करण्यासाठी
करोडो हात इथे सज्ज असतांना ....
कारण ;
पाणी एवढे कुठे निर्मळ राहिलेय आता?
पाणी पेटू लागलेय चराचरात
वैश्विक युद्धाचे बीजारोपण
ह्या पाण्यामुळे होईल की काय
असे वाटते ,,,,
मनःशांती करणारे
तनशुद्धी करणारे
पाणीही पेटू लागलेय आता ....!!!!
