पाणी
पाणी

1 min

12.1K
निर्मळ स्वच्छ नितळ
निस्वार्थ पारदर्शक पाणी
पृथ्वीवर आले अमृत बनून
पावसाच्या रुपानी
मातीचे घेतो चुंबन
देतो तिला अलींगण
तुझ्या तिचा मिलनाने
खुलतात तळे राने
आकाशातून जमिनीतून
धबधब्या तळावरून
डोंगर पहाडावरून
खोल-खोल दऱ्या तून
वाहतो पाणी झुळझुळ
अथांग समूहात
तुझे विक्राळ रूप
लाटा वरती खेळती खूप
तुझ्याशिवाय प्राणी मानवाला
नाही रुप
पाणीच करतो जीवनाचे मापन
पाण्यामुळेच आहे जीवन