पाणी
पाणी
1 min
248
पाऊस पाणी कुठे पडेना
सगळीकडे दुष्काळ पडला,
माझा गरीब शेतकरी बाप
अरे खूप ढसाढसा रडला.
भाजीभाकरीची काळजी
देवा बळीराजाला माझ्या लागावी ,
विणवू तुला किती आता
पाण्यावाचून तहान कशी भागावी.
घरीदारी नाही कुठे पाणी
जगाव तरी कस रे भगवंता,
उभ पिक गेलं रे जळून
सांग काय कराव रे आता.
पाऊसधारा कोसळू दे देवा
सगळीकडे कर पाणीच पाणी,
ओलाचिंब होवू दे रे आसमंत
भिजून जाऊदे रे सारी धरणी.
नदीनाले भरून वाहती असे
बळीराजाच्या डोळा पाणी,
माझे पिक येईल भरात
आनंदाने गातो गोड गाणी.
