STORYMIRROR

Prashant Shinde

Others

3  

Prashant Shinde

Others

पाणी..थेंब

पाणी..थेंब

1 min
12.1K

पाणी बचत...!

पाणी आणते आणीबाणी

कोणीही म्हणो आणखी काही

मला वाटते करावी निगराणी

पहावे कोठे मुरते पाणी

थेंब थेंब वाचवा सांगत फिरतो

कारण नसता नळ सुरू ठेवतो

पाण्याचा ओघळ गल्ली गाठतो

जीव माझा तीळ तीळ तुटतो

मिळते म्हणून ओरबाडू नये

नको ते वर्तन करू नये

पाण्यासाठी हात पसरू नये

आहे ते वाया घालवू नये

एक तीळ सात जणांच्यात

वाटून खाण्याची आपली परंपरा

त्याचा जरा आठव करा

आणि पाणी बचतीचा वसा धरा

संचय थेंबा थेंबाने होतो म्हणतात

ते मग पाणी असो अथवा अर्थ

करू प्रतिज्ञा बचतीची बिनशर्त

बाजूस सारून एकदा थोडा स्वार्थ

पहा हास्य खुलेलं आपल्या घरी

रेलचेलची नांदता सदा हमी

आजची बचत पाण्याची अन् अर्थाची

येईल पुढे भविष्यात आपल्याच कामी....!


Rate this content
Log in