पांडुरंग
पांडुरंग
जसा मी मौन झालो, तसाच तू सुद्धा मौन हो,
शांतीमय समतेचा जल्लोष पायवारी दिंडीत हो,
जिथे अंधश्रद्धा जुगार झाली तिथेच
रामायण आणि महाभारत तांडव झाला
या काल्पनिक देवात्वाची माझ्यासंग
रचना गलिच्छ व्यवहार करुन
माझी विठ्ठ हलवू नकोस माणसा...!
देव मानव आणि असूर याच्या बुध्दीमतेवर
विज्ञानाचा जाळ काढून युगंधर
आत्माचा महामानव जिथे
युध्द ही घडणार नाही षडयंत्राचे
तिथे पंढरपूर क्षेत्र नागवंशीय..!
फक्त उदारमतवादी संघर्षात
मी देव नसून ही स्पर्धाधारक
मानवतेच्या धर्मावर बंदिस्त
विठेवरचा विठ्ठल नसूनही
बावीस प्रतिज्ञेचा बुध्द आहे
समतेचा गाढा संसार चालतोय ना
लेकराचा तिथे पुन्हा विषमता वाढवून
काय ? सिद्ध करू पाहतोस,
तू सुद्धा माणसा शांत हो आत्ता
अन् वारकरी होऊन माझ दर्शन घे
पाडुंरंग...! पाडुंरंग....!
