कवितासुध्दा अशी असते....
कवितासुध्दा अशी असते....
कवितासुध्दा अशी असते,
जगणा-याला जगूच देत नाही
मरणा-याला मरूही देत नाही
मेलेल्याचे मुर्दे खोदून काढते
आणि होतोय सुरू पंचनामा
जगणा-यात आणि मेलेल्यात
सरकारी कायद्यानुसार चौकशी
शोधाशोध सत्याची झापड घालते
लंकापेटली तशी तुमचे ही जीवन
पेटवत चालली सरकारी माणस
पुरावा शोधून शोधून कोर्टापर्यंत
सत्याची झोक ललकारत माणस
मग तुम्ही कसे ❓मरा आत्महत्या
की खून प्रकरणात फसलेले कित्येक
जण ये-याघे-या घालून टापटीप
कपडेही घालून पोलीस संरक्षणासंहित
वकील ही काही आपली खासगी
धुळण करतोच सत्यासाठी कोर्टात
एकंदरीत गुप्त ही उपटून काढतो
मुळासकट शब्दशब्दानी पुरावा नसताना
आग पेटवून शब्दाची चिंता वाढवितो
विरोधकांची पुराव्यासंहित एक एकटे
माणसे ओकू लागतात शब्दाची आग
शांत व्हा कोर्ट चालू आहे निर्णयासाठी
