धम्मचक्र प्रवर्तन दिन
धम्मचक्र प्रवर्तन दिन
आनंदाने सुखकार्याने दीन
एकटावलो बुध्दाच्या विचारात
जन्म केला धन्य अमुचा
धम्मदीक्षा घेऊनी बुध्द विहारात...
भष्ट झालो होतो नियतीने
धर्मकांड करत गेलो जन्मापासून
वणवण भूक माझी हिणकस
वाटे जगत्या धर्मात जन्मापासून...
लाथाडले जीवन आम्ही
एकता ही निळया झेड्याखाली
पंचशील उंच आकाशा जाई
पंतग होऊन झोका घेई
झुकलेली मान माझी उंबरठ्यावर
उंचावली विज्ञानाने सदैव
बुध्दाच्या चरणी बावीस प्रतिज्ञेमुळे
बुध्द विहारात मानवतेच्या बळावर
गावाच्या गावकुसाबाहेर वस्ती
दिसे डोंगर जळल्यावानी
दिंड तिच निघे स्वकर्माची
असूनही जिवंत वाटे मेल्यावानी...
