STORYMIRROR

Prashant Shinde

Others

4  

Prashant Shinde

Others

पांडुरंग वारी...!

पांडुरंग वारी...!

1 min
398

दर्शनासाठी व्याकुळ मी 

जाणिले त्या श्री हरीने

द्वार केले क्षणात मुक्त

पांडुरंग चरणी झाला लिन भक्त


सुख लाभले अपार

पाहुनी श्री मुख

उभा कटीवरी ठेवुनी हात

गोड माझा पांडुरंग


मन झाले तृप्त

तूच एक मजला आप्त

प्रेम अंतरीचे हे गुप्त

असता अंतरात लुप्त


गळा भेट तुझी माझी

खूण गाठ आहे मायेत

राहू दे अशेच मला

सदैव तुझ्याच छायेत


आता मागणे एकचि देवा

नको व्याप कोणता लावू पाठी

उभा रहाच सर्व संकटासाठी

समोर माझ्या रे तू जगजेठी


कृपा सदैव तुझी

माझ्या पाठीशी असुदे

आशीर्वादाचा हात तुझा

सदा शिरावरी माझ्या राहू दे....!


Rate this content
Log in