पालवी प्रेमाची
पालवी प्रेमाची
1 min
262
लागली चाहुल
वसंत ऋतुची
वेलींना फुटली
पालवी प्रेमाची
हिरव्या रंगात
रंगून मातीची
सजली, रंगली
बहर प्रितीची
फुलला मोगरा
ओळख मनाची
नटली सावळी
मोरनी सख्याची
घेऊन पवन
संगत सुरांची
वाहतो सारून
वर्दळ पानांची
भुलले जीवन
भुरळ मनाची
कळले रूदन
निसर्ग कणाची...
