पाहिला पाऊस
पाहिला पाऊस
आला पहिला पाऊस
धरती ओली चिंब झाली
पाऊस मनातला येता
धरती पावसात न्हाली. //१//
पडल्या पावसाच्या धारा
सोबत पडल्यात गारा
आला सोसाट्याच्या वारा
दिसे हिरवी गार वसुंधरा. //२//
आकाशात काळे काळे ढग
आले एकाएकी जमून
काळे कुट्ट झाले आभाळ
पडला वादळ पाऊस जोरान //३//
नभात ढगांचा गडगडाट
सोबत विजांचा लखलखाट
त्यात पाऊस वादळ तुफान
काय नभाचा तो थाट. //४//
पहिल्या पावसाचे स्वागत
विजेच्या चमचमत्या प्रकाशाने होई
ढगांच्या आवाजाने सारा
परिसर दणाणून जाई //५//
पाऊस पडल्यावर नभात
निघे इंद्रधनुष्याचे निशाण
पहिल्या पावसाचे स्वागत
इंद्रधनुष्याचे सात रंगानं. //६//
