STORYMIRROR

Chandanlal Bisen

Others

3  

Chandanlal Bisen

Others

पाढे बे एक बे ची

पाढे बे एक बे ची

1 min
186

निर्धाराने पुढे जाऊ या 

उघडू द्वार यशाची

तारखेनुसार पाठ करूया 

पाढे बे एक बे ची !!धृ!!


नवोपक्रमाने सुरु आमचा

पाढे पाठ करावं

रोजची फक्त एक ओळ

सर्वांनी पाठ करावं

निश्चय आमचा सबळ आता

घृणा करू आळशाची !!१!!


गुना भागा अन् इतरं

उकल करण्या पाढेच चावी

या चावीने सुटतील उकले

यास्तव पाढे पाठ करावी

तीस दिवस महिन्याचे

तीस ओळी पाठांतराची !!2!!


या उपरांती आमचा निर्धार

मोठे पाढे बनविण्याचा

क्लुप्ती समजुनी पाढे गिरवूनी

हेतू सफल करू उपक्रमाचा

मागे आम्ही सरणार नाही

ज्योत पेटवू ज्ञानाची !!3!!


Rate this content
Log in