पाच पनवती
पाच पनवती
अमेय सरांचे पाच पनवती आम्ही
त्यात भर पडली आणखी चार वानरांची
रचिले मग आधुनिक रामायण आकृती festival साठी
एक वानर हरवल जे कुठेही सापडेना
नाव ज्याचे कल्पक जो होता आमच्या नाटकातला हनम्या
दूसर वानर लय भारी चाले ज्याची मसकरी दिवसभरी
तो होता रेमबो आमचा मुख्य नायक यज्ञेश हरवूनरी
खोडकर ज्याचा स्वभाव असा आमचा प्रसाद
त्याच्या पोरकटपणा वर जाऊ नका कारण तो तर आहे सर्वांचा बाप
होती एक गोड मुलगी त्या समुहात कलागुणांनी संपन्न
नाव जिचे दिक्षा अप्सरा आमची साजसदगुण
दोन होत्या अबोल सालस परि गुणवंत कन्या
त्या म्हणजे आमच्या वानरसेनतले श्रद्धा आणि श्वेता
रोहिणी होती व्यवहारी मोजून मापून बोले सगळं काही
मीनू आणि सोनूची चाले दिवसभर शुटींगसाठी भटकंती
घेऊन आले तेच मग नाटक “नशा मुक्ती” समाज प्रबोधना साठी
दिवसागणिक जसं जसे प्रयोग लागले वाढू
तस तसे आमच्या मैत्री चे रंग लागले चडू
सगळं काही सुरू होत सुरळीत
पण कधी कशी ती नियती फिरली झाला सगळाच खेळ
डाव टाकला काळाने आणि घेऊन गेली मीनूला ती कठोर वेळ....
