पाच मार्च
पाच मार्च
द म भरलाय
हा का मारणाऱ्या रोगाला
वा ट लावीन म्हणून बजावले
दि माख दाखवणाऱ्या शत्रूला...!
वस्त्रहीन केले आहे
सर्वांग भाजून काढण्यासाठी
सुळावर चढवले आहे
प्रताप दाखवण्यासाठी....
भाग्य आमचे चांगले
तत्वनिष्ठ जीवन जगतो आपण
छाटणी होते संकटांची
नकळत सारे करतो म्हणून आपण...
एक दिवा प्रज्वलित होता
अंधकार दूर होतो
प्रकाशाच्या सानिध्यात
मोकळा श्वास घेता येतो...
चला सारा देश आता
एक एक दिवा पेटवून प्रकाशमान करू
आरोग्य संपन्न जीवनासाठी
संकटमुक्त होऊनी मोकळा श्वास घेऊ....
जणू आज दहावाच
अनिष्ट गोष्टींचा घातला जाणार आहे
एक एक दिवा पेटता
नवचैतन्याचा इतिहास घडणार आहे...!
