ओवा..!
ओवा..!
लेखक होणं आणि लेखक असणं
यात फार मोठा फरक आहे
कवी होणं आणि कवी असणं
यात फार मोठा फरक आहे
मित्र होणं आणि मित्र असणं
यात फार मोठा फरक आहे
नवरा होणं आणि नवरा असणं
यात फार मोठा फरक आहे
बायको होणं आणि बायको असणं
यात फार मोठा फरक आहे
बाप होणं आणि बाप असणं
यात फार मोठा फरक आहे
मुलगा होणं आणि मुलगा असणं
यात फार मोठा फरक आहे
मुलगी होणं आणि मुलगी असणं
यात फार मोठा फरक आहे
नेता होणं आणि नेता असणं
यात फार मोठा फरक आहे
शत्रू होणं आणि शत्रू असणं
यात फार मोठा फरक आहे
देश भक्त होणं आणि देशभक्त असणं
यात फार मोठा फरक आहे
स्वार्थी होणं आणि स्वार्थी असणं
यात फार मोठा फरक आहे
त्यागी होणं आणि त्यागी असणं
यात फार मोठा फरक आहे
कलाकार होणं आणि कलाकार असणं
यात फार मोठा फरक आहे
छंद जोपासणं आणि छंद असणं
यात फार मोठा फरक आहे
चांगलं होणं आणि चांगलं असणं
यात फार मोठा फरक आहे
आंनदी होणं आणि आंनदी असणं
यात फार मोठा फरक आहे
पोटात दुखणं आणि पोटदुखी असणं
यात फार मोठा फरक आहे
अहंकारी होणं आणि अहंकारी असणं
यात फार मोठा फरक आहे
नम्र होणं आणि नम्र असणं
यात फार मीठ फरक आहे
तसं
वास्तुविशारद होणं आणि वास्तुविशारद असणं
यातही फार मोठा फरक आहे
अस प्रत्येक गोष्टीचं
वेग वेगळं होणं आणि वेग वेगळंअसणं
यात फार मोठा फरक आहे
घर बांधणं आणि घर उभा करणं
यातही फार मोठा फरक आहे
जी लोक वास्तुविशारद होतात
ती घर बांधतात
आणि
जी माणसं वास्तुविशारद असतात
ती माणसं घरं उभी करतात
आणि
आता अस वाटत
वास्तुविशारद झाल्याच्या आनंदा पेक्षा
वास्तुविशारद असण्याचा
आंनद फार मोठा आहे
वास्तुविशारद होऊन घर बांधण्या ऐवजी
वास्तुविशारद म्हणून
घरं उभारण्याची साधनाच
जास्त सुखावह आहे यात शंका नाही
कारण
घोडा गाडी, बंगला माडी किंव्हा
पैसा अडका मान मरातब नसला
तरी
या साधनेत
सौख्य समाधान शांतीला
काही कमी नाही,
सौख्य समाधान शांतीला
काही कमी नाही...!
