ओसाड माझे घर....
ओसाड माझे घर....
1 min
225
ओसाड माझे घर
कसे म्हणता आपण,
निसर्गाच्या सानिध्यात
जपताे मी माणूसपण...
ओसाड माझे घर
दूर माळरानावर,
प्राणी पक्ष्यांच्या संगतीत
जीवन चालले बराेबर...
ओसाड माझे घर
माेठ्या मनाचे स्वागत,
कायमच असते साेबतीला
भाकरी ठेच्याची पंगत...
ओसाड माझे घर
आतिथ्य माझे साधे भाेळे,
साेबतीला रानमेवा
बहरणारे रानमळे...
